Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, बडा नेता नॉटरीचेबल; शिंदे गटात करणार प्रवेश?

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जशा निवडणुका जवळ येतील तसे बडे नेते पक्ष बदलत असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. अनेक बड्या नेत्यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्ष बदलले आहेत. मागच्या काही दिवसापासून नाशिक लोकसभा मतदारसंघ देखील चांगलाच चर्चेत आहे. नाशिक मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणारी यावरून सहकारी पक्षांमध्ये मोठी ओढाताण सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत.

Politics News । राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी, शरद पवारांनी दिला भाजपला धक्का

सध्या नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट अत्यंत सक्रिय व आक्रमक झाला आहे. त्यामुळे उमेदवार आणि जागा शिंदे गटालाच पाहिजे यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मागच्या काही दिवसापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र त्याला मोठा विरोध झाला होता. आता या उमेदवारीला विरोध झाल्यामुळे शिवसेना शिंदे गटाने पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.

Viral News । उडत्या विमानात जोडप्याने खुलेआम सुरू केला रोमान्स, पाहून प्रवासी झाले थक्क; फोटोही झाले व्हायरल

यासंदर्भात जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि शिवसेना ठाकरे गटातील नाराज लोकसभा प्रमुख विजय करंजकर यांना उमेदवारीचे आमिष दाखवले जात आहे. मागच्या काही दिवसापासून ठाकरे गटाचे करंजकर देखील नाराज आहेत. याच संधीचा लाभ शिंदे गटाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Lok Sabha Elections । शरद पवारांबद्दल छगन भुजबळांचा सर्वात मोठा दावा, म्हणाले…

शिंदे गटाने करंजकर यांच्याशी संपर्क असेल असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यांची बोलणी झाली आहे. मात्र एकनाथ शिंदे गटाने काही अटी घातल्याने करंजकर यांची कोंडी झाली आहे. माजी आमदार योगेश घोलप यांनी देखील करंजकर यांच्यासोबत शिंदे गटात प्रवेश करावा अशी अट असल्याची माहिती मिळत आहे. ती अट जर पूर्ण झाली तर करंजकर यांचा नाशिकच्या उमेदवारीसाठी विचारू केला जाऊ शकतो असे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काळात काय घडामोडी घडणार हे पहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis । काँग्रेसबद्दल फडणवीसांचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, “त्यांना शून्यावर…”

Spread the love