
Uddhav Thackeray । महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचा थरार वाढत असताना, भाजपने शिवसेना (ठाकरे गट)ला मोठा धक्का दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ठाकरे गटाचे अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी भाजपमध्ये सामील झाले आहेत. या पक्षप्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Pune Crime । धक्कादायक! पुण्यात रंग लावण्याच्या वादातून कोयता हल्ला, तरुण गंभीर जखमी
जळगावमधील ठाकरे गटाच्या तीन माजी नगराध्यक्षांसह अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांच्या प्रवेशाने भाजपचा स्थानिक प्रभाव अधिक वाढला आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील भाजप कार्यालयात पार पडला.
या नेत्यांमध्ये दशरथ महाजन, किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी आणि भगवान महाजन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अनेक इतर पदाधिकारी आणि माजी नगरसेवकही भाजपमध्ये सामील झाले आहेत. या पक्षप्रवेशामुळे जळगावमधील शिवसेना (ठाकरे गट) कमजोर होत असल्याचे दिसून येत आहे, तर भाजपचा दबदबा वाढत आहे.
Supriya Sule । बरं झालं पक्ष फुटला, सुप्रिया सुळे यांचं धक्कादायक वक्तव्य
दुसरीकडे, शिंदे गट देखील आपल्या “ऑपरेशन टायगर” मोहिमेअंतर्गत शिवसेना (ठाकरे गट)तील अनेक नेत्यांना शिंदे गटात सामील करत आहे. यामुळे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Central Bank l धक्कादायक! सेंट्रल बँकेत भीषण आग, कागदपत्रे आणि पैसे जळून खाक