Uddhav Thackeray | मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गटाला लागलेली गळती अजूनही थांबलेली नाही. अनेक मोठे नेते, पदाधिकारी शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल सात वेळा मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai Municipal Corporation) निवडून आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सौ.तृष्णा विश्वासराव (Trushna Vishwasrao) यांनी आज काल शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
भीषण अपघात! देवदर्शनाला आलेल्या भाविकांची बस पलटली, दहा ते पंधरा भाविक गंभीर जखमी
पाहा एकनाथ शिंदे यांचे जशेच्या तशे ट्विट
तब्बल सात वेळा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सौ.तृष्णा विश्वासराव यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांची #शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने तसेच इर्शाळवाडी दुर्घटनेवेळी ज्या पद्धतीने मदतकार्यात स्वतःला झोकून देऊन काम केले, लोकांना धीर दिला आणि अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले, ते पाहून माझ्या नेतृत्वाबद्दल मनात आदर निर्माण झाल्यानेच शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे मत @officeoftrushna यांनी यासमयी व्यक्त केले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण अंगिकारून राज्य सरकारचे काम सुरू असून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या बाळासाहेबांनी आखून दिलेल्या तत्वावर कार्य करताना संकटकाळात मदतीसाठी धावून जाणे हे शिवसैनिकाचे कर्तव्य असून कार्यकर्ता मुख्यमंत्री म्हणून मदतीला धावून गेलो असे यावेळी नमूद केले.
मुंबईचा कायापालट करून गेल्या १५ वर्षांत जे काम झाले नाही ते करायला सुरुवात केली असून आपल्या विभागातील प्रश्न देखील सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात येतील असे यावेळी स्पष्ट केले. असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.