Site icon e लोकहित | Marathi News

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. हे गट सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली. ठाकरे गटातील अनेक बडे नेते, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Earthquake । मोठी बातमी! अफगाणिस्तानमध्ये तीव्र भूकंप; मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त; अनेकजण जखमी

मागच्या काही दिवसापासून ठाकरे गटाला लागलेली गळती अजून थांबलेली नाही. दरम्यान सध्या आमदार सुनील प्रभू यांच्या विधानसभा मतदारसंघातून नगरसेविकासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटांमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती समोर आली आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे. यामध्ये दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेविका विनया विष्णू सावंत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

Uddhav Thackeray । आत्ताची सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली परवानगी; नेमकं कारण काय?

विनया विष्णू सावंत ह्या मालाड पूर्वेत दिंडोशी विधानसभा मतदारसंघात वार्ड क्रमांक ३९ मधील माजी नगरसेविका असून त्यांच्या पतीने देखील शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar । निकालाआधीच शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिला मोठा धक्का

Spread the love
Exit mobile version