Uddhav Thackeray । आमदार अपात्रतेच्या निकालानंतर शिंदे गटामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर ठाकरे गट पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच उल्हासनगर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा झाली या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा (Shinde group) चांगलाच समाचार घेतला आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “गद्दारांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. पुन्हा शिवरायांच्या जन्मभूमीत असे गद्दार जन्माला आले नाही पाहिजेत. यापुढे निष्ठावंतांनाच तिकीट दिले जातील. याआधी माझी चूक झाली आता अशी चूक परत कधीच होणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी उल्हासनगर येथील सभेत शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
Sharad Pawar । अयोध्या आमंत्रणाबाबत शरद पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य
त्याचबरोबर मोदींच्या कालच्या दौऱ्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. काल मोदींनी ही साफसफाई केली. ही गोष्ट चांगली आहे मात्र आम्ही जाहीर केल्यानंतर मोदी काळाराम मंदिरात गेले. तसंच आज मी जाहीर करतो की मी शिवनेरीला जाणार आहे. आता मोदींनी माझ्या आधी त्या ठिकाणी पोहोचून थोडी साफसफाई करावी. असा टोला त्यांनी काळाराम मंदिरात मोदी यांनी केलेल्या साफसफाईनंतर लगावला आहे.
Sharad Pawar । अयोध्या आमंत्रणाबाबत शरद पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य