Uddhav Thackeray । एकीकडे लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) तोंडावर आल्या आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाहीत. ठाकरे गटातील अनेक नेते पक्षाला रामराम ठोकत इतर पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामध्येच आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या शिल्पा बोडखे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे, एवढेच नाही तर त्यांनी पक्षातील दोन महिला नेत्यांची नावे घेत त्यांच्या मनमानी कारभारामुळे आपण पक्ष सोडत असल्याचे देखील सांगितले आहे. (Politics News )
Manoj Jarange । “मनोज जरांगे हा शरद पवार यांचा माणूस आहे” महिलेचे गंभीर आरोप
शिल्पा बोडखे या शिवसेना पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता या पदावर काम करत होत्या. मात्र शिवसेना भवनात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांनी सतत षड्यंत्र रचून वारंवार संघटना विस्कळीत केल्याचा आरोप शिल्पा बोडखे यांनी केला आहे. शिल्पा बोडखे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
Manoj Jarange Patil । आंदोलनातील महिलेचे मनोज जरांगे पाटील यांच्यावर धक्कादायक आरोप!
ट्विट करत शिल्पा बोडखे यांनी लिहिले की, “माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र…माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते उद्धव ठाकरेजी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे…मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा.” असे ट्विट त्यांनी केले आहे.
Ravindra Dhangekar । रवींद्र धंगेकर यांचा सर्वात मोठा खळबळजनक आरोप
माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र…
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) February 22, 2024
माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते @AUThackeray जी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत… pic.twitter.com/OZJUyFbKwa