
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. शुक्रवारी (दि.17) झालेल्या या निर्णयाने मागील साठ वर्षांचे ठाकरे व शिवसेना हे समीकरण संपुष्टात आले आहे. यामुळे ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. दरम्यान ठाकरेंसमोरील अडचणी थांबायच नाव घेतच नाहीयेत. निवडणूक आयोगाने दिलेला धक्का, आणि त्याचबरोबर ठाकरेंसमोर रोज नवनवीन आव्हाने उभे राहत आहेत.
एफडी करताय तर थोडं थांबा! ‘या’ आर्थिक गुंतवणुकीत सुद्धा आहेत मोठे तोटे
ठाकरे गटाला अलीकडेच ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले होते. आता हे चिन्ह देखील जाणार असल्याचं म्हंटल जात आहे. दरम्यान आता यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पहाटेच्या शपथविधीबाबत भगतसिंह कोश्यारींनी केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “माझ्याकडे अजित पवार…”
उद्धव ठाकरे म्हणाले, मशाल हे चिन्हं गेलं तरी अजून 10 चिन्हं माझ्या मनात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर आता जागे झालो नाही तर २०२४ मध्ये हुकुमशाही येईल असं देखील कार्यकर्त्यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
ठाकरे गटाला दिलासा नाहीच! तातडीनं सुनावणीस करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार