राजकीय वर्तुळात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान आज महाविकास आघाडीची नागपूर येथे वज्रमूठ सभा होत आहे. महाविकास आघाडीने पहिल्यांदाच नागपुरात सभेचे आयोजन केले आहे. या सभेसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित आहेत. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
सर्वात मोठी बातमी! उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी
उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरून जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकारमध्ये असताना न्यायालयाने राममंदिरांचा निकाल दिला. आता हे अयोध्येला गेले. मात्र सुरुवातीला हे सुरतला गेला. हिंदुत्व असतं तर आधी अयोध्येला गेले असते.” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
सर्वात मोठी बातमी! उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर देखील निशाणा साधलाय. एकनाथ शिंदे अयोध्येला जाताच त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येला गेले आजपर्यंत फडणवीस कधी अयोध्येला गेले, हे तुम्हाला कधी आठवतं का?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
16 आमदार अपात्र झाले तरीही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार; अजित पवारांचा मोठा दावा