Uddhav Thackeray Group । सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचे वारे वाहत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी पक्ष बांधणी सुरू केली आहे. हे सर्व घडत असतानाच ठाकरे गटामध्ये गळती सुरूच आहे. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. बीडमध्ये ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत.
Aditya Thackeray । आदित्य ठाकरे यांनी केला सर्वात मोठा खळबळजनक दावा!
अनिल जगताप यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. जिल्हाप्रमुख पद काढून सह संपर्कप्रमुख दिल्याने ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अनिल जगताप यांच्यासह 35 सरपंच, असंख्य पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
त्याचबरोबर, पक्ष सोडतांना अनिल जगताप यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी ते म्हणाले की, मी मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो त्यामुळे अंधारे यांनी कारस्थान करून माझे जिल्हाप्रमुख पद काढलं. त्याचबरोबर बीड विधानसभेचे तिकीट मिळाले नाही तरी मी विधानसभा लढवणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
Sharad Mohol fired । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! पुण्यातील गुंड शरद मोहोळवर गोळीबार