काल (दि.25) आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) व पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान यांनी उद्धव ठाकरेंची ( Uddhav Thackeray) भेट घेतली आहे. ‘मातोश्री’वर ही बैठक पार पडली. या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“…तर इलॉन मस्क पेक्षा मी जास्त श्रीमंत असतो”, योगगुरू रामदेव बाबा यांचे विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चोरी आणि चिन्हाची चोरी झाली, मात्र बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, आणि वाघाचे उद्धव ठाकरे हे सुपुत्र आहेत, त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्या मागे असल्याचं मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं आहे.
भीषण अपघात! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला, २२ विद्यार्थी जखमी
या भेटीनंतर महाराष्ट्राच्या ( Maharashtra) राजकारणात नवीन चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे गट व आम आदमी पार्टी यांची युती होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे व अरविंद केजरीवाल यांनी सूचक वक्तव्ये देखील केली आहेत. केजरीवाल यांच्या भेटीबद्दल विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले की, अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत? हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
अगामी काळात आम आदमी पार्टी आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढवतील का ? असे विचारण्यात येताच अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत की, ” 24 तास निवडणुकांबाबत विचार करणारा देशात फक्त एकच पक्ष आहे. आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार करत नाही. आम्ही फक्त देशाचा विचार करतो. आमच्यासमोर देश आहे. आमच्या समोर देशातील बेरोजगार युवक, शेतकरी, गृहिणी व महागाई आहे. भेटीत अशा मुद्द्यांवर आमच्यात चर्चा झाली. मात्र जेव्हा निवडणूक येईल तेव्हा निवडणुकीवर देखील चर्चा करू. “
कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याने ठेवली ऑफर, “शेतात या आणि पाहिजे तितका कांदा फुकट न्या…”