लव्ह जिहाद, गोहत्या व धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मागील काही दिवसांत मोर्चे निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून देखील विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. दिल्लीमधील श्रद्धा आणि आफताबच्या प्रकरणानंतर या मागण्या जोर धरू लागल्या आहेत.
एक वक्तव्य आणि नितीश कुमार पुरते अडकले; म्हणाले, “आम्ही पुरुष रोज लैंगिक संबंध ठेवतो परंतु,..”
दरम्यान भाजपा नेते आशिष शेलार ( Aashish Shelar) यांनी देखील यासंबंधी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लव्ह जिहादच्या घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्याला तडा जात आहे, यामुळे सरकारने लव्ह जिहाद विरोधात लवकरात लवकर कायदा बनवावा असे मत आशिष शेलार यांनी मांडले आहे. या कायद्याला नागरिकांनीसुद्धा समर्थन द्यावे याबाबत देखील ते बोलले आहेत.
शिवसेनेतून बाहेर पडणं सोप्प न्हवतं; गिरीश महाजन यांची कबुली! मिशन फेल होईल याचीही वाटली होती भीती…
राज्यात ‘एका विशिष्ट वर्गाकडून महिला व मुलींवर रोज अन्याय अत्याचार केला जातो.’ तसेच हिंदू मुली म्हणजे या लोकांना खेळाचे साधन वाटत आहे का ? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. या लोकांना फक्त हिंदू धर्मातील मुली, महिला व भगिनी यांच्यावरच अन्याय करावा वाटतो काय ? असे म्हणत आशिष शेलार यांनी आपली संतप्त भूमिका मांडली आहे.
प्रवीण तरडे यांची मोठी घोषणा! मुळशी पॅटर्नचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
“लव्ह जिहाद ( love Jihad ) व साखळी बॉम्बस्फोट धमकी यावर ठाकरे अजूनही गप्प आहेत. एका विशिष्ट वर्गाच्या मतासाठी उद्धव ठाकरे बोटचेपी भूमिका घेत आहेत. हिरव्या मतांसाठी ते गप्प आहेत. असे म्हणत आशिष शेलार यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखती मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील धारेवर धरले आहे.
धक्कादायक! शैक्षणिक सहलीला गेलेले विद्यार्थी रायगडच्या समुद्रात बुडाले