
मुंबई : शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वादविवाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतायेत. यामध्येच आता मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. करोना महासाथीच्या काळात ते घराबाहेर पडले नाहीत. वर्षा बंगला सोडताना एखादी मुलगी सासरी जात असल्याचे सोंग उद्धव ठाकरे यांनी केले, अशी जहरी टीका भुमरेंनी केली. ते माध्यमांशी बोलत होते.
समाजमाध्यमांवरील या व्हायरल संदेशाने घातली दहशत, मुले चोरणारी टोळी ठरली अफवा
कोरोनाकाळात समाज एवढ्या संकटात होता तरीहि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोणत्याच जिल्ह्यात गेले नाहीत. ते फक्त टीव्हीवर दिसायचे आणि टीव्ही बंद केला की गायब व्हायचे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही एखाद्या ठिकाणाला भेट दिली नाही. पण आता त्यांना सगळीकडे जाण्यासाठी वेळ आहे, असे देखील संदीपान भुमरे म्हणाले आहेत.
सकाळी पोट नीट साफ होत नाही? मग ‘हा’ करा उपाय, मिळेल मिनिटात आराम
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवसस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामधून उद्धव ठाकरेंना बाहेर पडायचे होते. पण नेमकं त्याच दिवशी त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांच्या तोंडाला देखील आदल्या दिवशी मास्क होते. पण जेव्हा वर्षा बंगला सोडायचा होता, तेव्हा एखादी मुलगी सासरी जात असल्याचे त्यांनी सोंग घेतले. रडारड सुरू होती, अशी जहरी टीका संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
Eknath Shinde: पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेवर एकनाथ शिंदेनी दिली प्रतिक्रिया म्हणाले…