
Politics News । राज्यात शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) फूट पडली आहे. हे दोन्ही पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा आगामी निवडणुका एकत्र लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आता यावर शिंदे गटातील नेत्याने भाष्य केले आहे. (Latest marathi news)
शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी हे वक्तव्य केले आहे. आगामी काळात भाजप म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना जाणार असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Maharashtra Politics । दमदाटी करून एकनाथ शिंदेंना अमित शहांनी शांत बसवलं, कोणी केला खळबळजनक दावा?
“आगामी काळात एक हजार टक्के मोदी साहेब आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार. माझा अंदाज कधीही चुकत नाही. निवडणूक ही तुमच्या पाच वर्षांच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. निवडणुक कोणतीही असो, शेवटचे दोन दिवस खुप महत्त्वाचे असतात. राजकारणात निवडणुकाजवळ आल्या की कार्यकर्त्यांचे सुगीचे दिवस येतात,” असेही शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत.