मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यामध्ये शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि भाजपसोबत युतीकरून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यांनतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. दरम्यान राज्यात घडलेल्या सत्तासंघर्षासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis:) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, कांदा पिकावर फिरवला ट्रॅक्टर; पाहा VIDEO
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यावेळी एकनाथ शिंदे बंडखोरी करत सुरतला गेले त्यावेळी उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) सत्तास्थापनेसंदर्भात विचारणा झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अरमान मलिकच्या पत्नींमध्ये पुन्हा एकदा वाद! व्हिडीओ होतोय व्हायरल
त्याचबरोबर फडणवीस पुढे म्हणाले, ज्यावेळी एकनाथ शिंदे आमदारांसह सुरतला गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि माझं बोलणं देखील झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “जे झालं ते झालं तुम्ही मुख्यमंत्री व्हा.” मात्र त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो की आता आम्ही खूप पुढे गेलो आहोत. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उच्चशिक्षित तरुणाचा भन्नाट प्रयोग! शेणापासून केला रंग निर्मितीचा उद्योग सुरू