Uddhav Thackeray | फोटोसेशन करण्यासाठी उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत; ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

Uddhav Thackeray | Uddhav Thackeray at Irshalwadi for photo session; 'Ya' leader strongly criticizes Uddhav Thackeray

Uddhav Thackeray | राज्यात पावसाने थैमान घातले असून रायगडमधल्या इर्शाळवाडीत तर दरड कोसळून संपूर्ण गावच नष्ट झाले आहे. ही अतिशय मन सुन्न करणारी घटना घडली आहे. या घटनेनंतर अनेक नेत्यांनी घटनास्थळी जाऊन तेथील परिस्थितीचा आठवा घेतला. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज इर्शाळवाडी गावााला आज भेट दिली. (Irshalwadi Latest Update)

Pune Landslide । किल्ले राजगडावर मोठी दुर्घटना; बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोसळली दरड

त्यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार देखील दिला. त्यांनी स्थानिकांची विचारपूस करत घाबरू नका. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीतील लोकांना धीर दिला आहे. यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Nitesh rane On uddhav Thackeray)

मुलं आई-वडिलांचा निरोप घेऊन शाळेत गेली, पण घरी आल्यावर पाहिलं असं काही की…

मुख्यमंत्री असताना तुम्ही काय मदत केली, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं. ते फक्त फोटोसेशन करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असतील. त्याचा काही उपयोग नाही. चित्रपट संपायला आला आणि हे पोहोचले आहेत. अशी खरमरीत टीका नितेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे आता नितेश राणे याच्या विधानाच्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.

Vidharbha Rain Update । मुसळधार पावसाने विदर्भात 48 तासात घेतला 8 जणांचा बळी, तर 30 नागरिक जखमी

Spread the love