एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) भाजपसोबत युती केल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक दररोज एकमेकांवर टीकाटिप्पणी करत आहेत. यामध्येच आता बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनीच आता, थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे.
धक्कादायक! गॅस गळतीने स्फोट होऊन सासू-सून गंभीर जखमी
खासदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) म्हणाले, “हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी माझ्याविरोधात बुलढाण्यातून निवडणूक लढवावी” असं खुलं आव्हान त्यांनी ठाकरेंना दिल आहे. प्रतापराव आक्रमक होण्याचं कारण म्हणजे, “उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातल्या चिखली येथे सभा घेतली होती आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रतापरावांना गद्दार खासदार म्हणत भाजपच्या तिकीटावर लढणार नाही हे जाहीर करा, असा टोला लगवला होता. यामुळे प्रतापराव देखील आक्रमक झाले आहेत.
एखाद्या महिलेकडे टक लावून पाहताय तर सावधान; 14 सेकंदापेक्षा जास्त वेळ झाल्यास होऊ शकते शिक्षा
दरम्यान, ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार होते. सत्तास्थापनांतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत 18 पैकी 13 खासदार गेले आहेत. त्यामध्ये प्रतापराव जाधव हे देखील होते.
जोपर्यंत काट्यांबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही; राजू शेट्टी आक्रमक