
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. काल (दि.17) झालेल्या या निर्णयाने मागील साठ वर्षांचे ठाकरे व शिवसेना हे समीकरण संपुष्टात आले आहे. यामुळे ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. यावर आता अनेक प्रतिक्रया येत आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे अर्थात शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे.
दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, त्यांनी आता ठाकरे नावाचा पक्ष काढावा, उद्धव ठाकरे यांना हे नाव वापरण्यास काही हरकत नाही, असा खोचक सल्ला दीपक केसरकर यांनी दिलाय. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
मोठी बातमी! ‘मिर्झापुर’ फेम शाहनवाज प्रधान यांचे निधन
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले ” निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले हा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. मराठी माणूस, हिंदुत्व हे बाळासाहेबांचे जे मुद्दे आहेत, यावर आता आम्ही खुलेपणाने बोलू शकतो. असं देखील यावेळी दीपक केसकर म्हणाले आहेत.
ठाकरेंना अजून एक मोठा धक्का! ठाकरे गटाच्या खासदाराने दिले शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र