Site icon e लोकहित | Marathi News

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांनी केली सर्वात मोठी मागणी; म्हणाले, “शिंदे सरकारची…”

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । सध्या नांदेड, संभाजीनगर आणि नागपूर याठिकाणी रुग्णालयामध्ये झालेल्या रुग्णांचा मृत्यूने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या मृत्यूवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. काल खासदार सुप्रिया सुळे या देखील नांदेड दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून थेट राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.

Viral Video | संतापजनक! जेवणाला उशीर झाला म्हणून सासऱ्याने केली सुनेला बेदम मारहाण, पाहा VIDEO

याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यावेळी कोरोना महारामारी होती त्यावेळी आम्ही कोरोनाच्या संकटातही माणसांचे जीव वाचवले. मात्र, या सरकारच्या काळात आरोग्याचे बारा वाजले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारचीच निपक्षपातीपणे सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी यांनी ही मागणी केली आहे.

Guar Cultivation । अशा पद्धतीने करा गवार लागवड, होईल बक्कळ कमाई

मोदी सरकारवरही साधला निशाणा

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आमचं सरकार असतानाही काही जागा रिक्त होत्या. मात्र त्याचा फटका रुग्णांना पडू दिला नव्हता. गेल्या चार पाच दिवसात जे बळी गेले त्यामागे सलग सुट्ट्यांचं कारण आहे काय? त्याची चौकशी केली पाहिजे. भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या मोदींना हे मान्य आहे काय? असा मोठा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

Ajit Pawar Vs Sharad Pawar । खरी राष्ट्रवादी कोणाची? अजित पवार की शरद पवार? आज होणार महत्त्वाची सुनावणी

Spread the love
Exit mobile version