Uddhav Thackeray । राज्यातील शिंदे सरकार बहुतेक कोसळेल – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray. The Shinde government in the state will mostly collapse - Uddhav Thackeray

बारसु रिफायनरी प्रकल्पावरून (Barsu Refinary Project) राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी बारसु रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांना चांगलेच सुनावले आहे. माझ्या कालावधीमध्ये केंद्रसरकारने अनेक चांगले प्रकल्प गुजरातला दिले. तेव्हा सध्याचे सत्ताधारी शेपूट घालून बसले होते? आता जनतेच्या घरावर उपऱ्यांची सुपारी घेऊन वरवंटा फिरवताना त्यांना लाज वाटली पाहिजे. एवढं वाटतंय तर बळ न वापरता लोकांसमोर जा, असे आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांना केले आहे.

महिलेसोबत विमानात घडला धक्कादायक प्रकार; ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

बारसु येथे माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी एक मोठा आणि महत्त्वाचा दावा केला आहे. बारसु प्रकल्पाला एवढा विरोध असून सुद्धा शिंदे सरकार मागे का हटत नाहीय. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्यातील शिंदे सरकार बहुतेक कोसळेल. त्यांनी पावले मागे नाही घेतली, तरी त्यांच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत.”

Virat Kohali । विराट कोहलीची त्याच्या जवळच्याच मित्राने केली पोलखोल; म्हणाला…

जर चांगला प्रकल्प असेल आणि गावकऱ्यांचा कसलाच विरोध नसेल तर मध्ये येण्याचे कारण नाही. मात्र ज्या पद्धतीने सरकारकडून दडपशाही सुरू आहे, त्यावरून यात काहीतरी काळंबेरं असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणून आमचा या प्रकल्पाला विरोध आहे. प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्याऐवजी लोकांसमोर आले पाहिजे. मी प्रकल्पासाठी पत्र दिले, तरी मी लोकांसमोर आलो. मग तुम्ही का येत नाही ? असा सवाल सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ मराठी कलाकारांसोबत घडला धक्कादायक प्रकार; ऐकून अंगावर काटा येईल…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *