Uddhav Thackeray । 22 जानेवारीला अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या दिवशी अनेक दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे आयोध्येत राम मंदिराला न जाता नाशिक येथील काळाराम मंदिरात महापूजा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनाही आग्रहाचे आमंत्रण दिलं आहे.
Uddhav Thackeray । “माझी चूक झाली, पुन्हा नाही होणार…”, उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे वक्तव्य
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्याचबरोबर या ठिकाणी साफसफाई देखील केली आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यामुळे आता मोदी आणि ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाणं याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. या दोन्ही नेत्यांकडून हिंदुत्वाचा कार्ड अधिक प्रबळ केलं जातंय का? अशा चर्चांना देखील उधाण आले आहे.
त्याचबरोबर नेमकं 22 जानेवारीला काळाराम मंदिरात महापूजा करून उद्धव ठाकरे यांना दलित बांधवांना आपल्या बाजूने खेचायचं आहे का? त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांना महापूजेचे निमंत्रण देऊन भाजपा आदिवासी समाजातून आलेल्या महिला राष्ट्रपतीला सन्मानाची वागणूक देत नाही हे अधोरेखित करायचे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.