Uddhav Thackeray । धाराशिव (Dharashiva) येथील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा ठाकरे गटाच्या विरोधात आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून नार्वेकर यांच्यावर सतत टीका केली जात आहे. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“लोकसभा उमेदवारीसाठी राहुल नार्वेकर यांनी आमच्याविरोधात निकाल दिला”, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. धाराशिवच्या कळंब या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
Pune Crime News । पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणात धक्कादायक माहिती; मिस्ट्री गर्ल आली समोर
त्याचबरोबर यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. या जाहीर सभेत त्यांनी अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर परिवारवादावर निशाणा साधला होता. यावर आता उद्धव ठाकरेंनी पलटवार केला आहे.
Maratha reservation । सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणावर न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश
धाराशिव येथे झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा ३३ वर्षीय मुलगा आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हो, मला आदित्यने मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. पण तसे होण्यासाठी तुम्हा सर्वांना आधी त्यांची त्या पदासाठी निवड करावी लागेल.” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घराणेशाहीच्या आरोपानंतर ठाकरे यांचे हे वक्तव्य आले आहे.