आयोध्या ( Aayodhya) दौऱ्यावरून येताच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. ” शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचा बाबरी मशीद पाडण्यात काडी मात्र संबंध नाही,” असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यावरून ठाकरे गट आक्रमक झाला असून उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय.
AK47 बंदूक चक्क पिकांच्या संरक्षणासाठी! वाचा सविस्तर
मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर यावेळी जुना इतिहास सांगत बाबरीच्या बाबत काय घडलं होतं हे देखील सांगितलं आहे.
संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांना देखील दिले आव्हान
याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. मात्र ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी सगळे उंदीरच बिळात लपलेले होते. कोणताही उंदीर बिळातून बाहेर आलेला नव्हता. उंदीर म्हणत भाजपवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलाय.
‘किसी का भाई किसी की जान’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; पाहा Video