विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. 23 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता या तैलचित्राचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची कार्यक्रमपत्रिका नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही पत्रिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख व बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला आहे.
शिवसेना आणि धनुष्यबाणावर आजही निर्णय नाहीच, ‘या’ तारखेला होणार सुनावणी
प्रोटोकॉल नुसार फक्त शासकीय पदावरच असणाऱ्या व्यक्तींची नावे या आमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आली आहेत. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष, विधानपरिषद सभापती आणि उपसभापती यांचा समावेश आहे. मात्र पुत्र असूनसुद्धा उद्धव ठाकरेंच ( Uddhav Thackeray) नाव या पत्रिकेत नसल्याने विविध चर्चा सुरू आहेत.
ब्रेकिंग! शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता? 7 जिल्हा प्रमुखांवर ठाकरे गटाचा आक्षेप
दरम्यान “ठाकरे कुटुंबातील सगळ्यांनाच या सोहळ्यासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित केले आहे” असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील एक दोन दिवसात ठाकरे कुटुंबिय, आमदार-खासदार व विविध क्षेत्रातील मान्यवर यांना आमंत्रण देण्यात येणार आहे. परंतु, व्यासपीठावर नक्की कोण असणार ? याबाबत अद्याप काहीच सांगण्यात आलेले नाही.
Sushant Singh: सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाला पुन्हा एक मोठा धक्का