Site icon e लोकहित | Marathi News

उद्धव ठाकरेंना ‘मशाल’ मिळणार? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष

Uddhav Thackeray will get 'Mashal'? Everyone's attention is on the hearing of the Supreme Court

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समस्या काही संपत नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांचा पक्ष आणि आणि चिन्हही गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जरी त्यांना दिलासा मिळाला तरी त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळाले नाही. दरम्यान त्यांना निवडणूक आयोगाने (Election Commission) नवीन चिन्ह दिले. परंतु त्यांनी घेतलेल्या पक्षाच्या चिन्हावर समता पार्टीने (Samata Party) आक्षेप घेतला. (Latest Marathi News)

Maharashtra Assembly Session । विधिमंडळात राष्ट्रवादीचे कार्यालय जैसे थे, अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र बसणार?

उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने आता दावा केला आहे. मशाल हे आमच्या पक्षाचं चिन्ह आहे ते दुसऱ्या पक्षाला कसे मिळू शकते? असा प्रश्न समता पार्टीकडून उपस्थित करत त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी होणार असल्याने या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. मशाल हे चिन्ह जरी समता पार्टीचे असले तरी अनेक वर्षांपासून समता पार्टी निवडणुकांसापासून लांब आहे. त्यामुळे त्यांनी या चिन्हाचा वापर केलाच नाही.

अधिवेशनाला आजपासून सुरूवात, संपूर्ण महाराष्ट्राचे ‘या’ मुद्द्यांकडे लक्ष

दरम्यान, यापूर्वी समता पार्टीचे उदय मंडल (Uday Mandal) यांनी हायकोर्टात (High Court) ही याचिका दाखल केली होती. परंतु तिथे त्यांची ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Rohit Pawar | धक्कादायक! रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

Spread the love
Exit mobile version