Maharashtra Politics । राज्याच्या राजकारणात अनेक भूकंप येत असतात. राज्यात लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यावेळी शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) पडलेल्या फुटीमुळे निवडणुका अटीतटीच्या होणार हे निश्चित झाले आहे. अशातच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेणार आहेत.
Maratha Reservation । मराठा आरक्षणावरून सरकारमध्ये खडाजंगी, शिंदे आणि अजित पवार गट आमनेसामने
उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेणार आहेत. या बैठकीत आगामी काळातील घडामोडी अवलंबून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर जागावाटप कसे करावे? कोणत्या पक्षाला किती जागा द्याव्यात? यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसह संपूर्ण राज्याचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
Bjp । निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! आमदाराची तब्येत खालावली
महायुती विरोधात देशात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. आघाडीच्या तीन मोठ्या बैठका पार पडल्या आहेत. आगामी निवडणुक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र लढवणार आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार? राजकीय भूकंपांनंतर जनता कोणाला बहुमत देणार हे आता निवडणुकांचे निकाल हाती आल्यांनतर स्पष्ट होईल.
Crime News । धक्कादायक! महिलांवर अश्लील व्हिडीओ तयार करण्यासाठी जबरदस्ती? 3 अभिनेत्यांना अटक