Uddhav Thackeray । वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करून शिवसेना पक्ष फोडला. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. शिवसेनेत सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट आपल्याला पाहायला मिळत आहे. सत्ता जाऊनही उद्धव ठाकरे यांच्या अजूनही अडचणी संपत नाहीत. सत्ताधाऱ्यांनी आता ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेते पदावरून निशाणा साधला आहे.
पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद गेला विकोपाला, पतीने मध्यरात्री केले धक्कादायक कृत्य की …
ठाकरे गटाकडे पुरेसे संख्याबळ नाही, त्यामुळे अंबादास दानवे यांना विरोधी पक्षावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेत अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते पदावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले.
विरोधी पक्षनेते पदावरून अंबादास दानवे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा करणार की नाही? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Kirit Somaiya । किरीट सोमय्यांनी दिली कथित अश्लील व्हायरल व्हिडिओवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…..