Uddhav Thackeray । मुंबई : मागच्या काही दिवसापासून ठाकरे गटाला धक्यावर धक्के बसत आहेत. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते शिंदे गटांमध्ये प्रवेश करत आहेत. आगामी लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये चांगलीच उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊट गोईंग सुरू असल्याचे दिसत आहे. यादरम्यान आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. (Politics News)
Agricultural News । अर्रर्र! बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका
ठाकरे गटातील दोन खासदार आणि आठ आमदार लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या सगळीकडे चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटातील दोन खासदार आणि आठ आमदार आमच्या संपर्कामध्ये आहेत असा दावा जाधव यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठे खिंडार पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Latest Marathi news)
Smartphone Tips । तुमचाही फोन सतत हँग होतोय का? तर ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो
शिंदे गटामध्ये प्रवेश करणारे खासदार आणि आमदार नेमके कोण याबाबत गुप्तता ठेवण्यात आली आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी जाणीवपूर्वक त्यांची नावे सांगितली नाहीत. सध्या राज्याच्या राजकारणात त्यांच्या दाव्याच्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहेत.
Onion Price । शेतकऱ्यांना मोठा धक्का! कांद्याचे दर रोखण्यासाठी सरकारने घेतला निर्णय