Site icon e लोकहित | Marathi News

Uddhav Thackeray । निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का!

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन प्रमुख आघाड्या, महाविकास आघाडी आणि महायुती, या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, आणि या संदर्भात पक्ष बदलण्याच्या हालचालीही सुरू आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी आता शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Accident News । बाळाच्या बारशानंतर पुण्याला परतताना भीषण अपघात; मायलेकासह चौघांचा मृत्यू

शिवाजी कापसे यांचा ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश हा ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. कापसे यांच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या गटफुटीनंतर अशा प्रकारची राजकीय बदल घडताना दिसत आहेत. कापसे हे शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील होणार आहेत, आणि हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज आयोजित केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या वेळी होणार आहे.

Pune Crime । पुण्यात अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाचा पिस्तूल लोड करत गोळीबार!

कापसे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले होते, परंतु त्यावेळी पक्षाने कैलास पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कापसे यांचा नाराजीचा सूर असताना आता त्यांना यंदाही उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा लाभ होण्याची शक्यता आहे, तर ठाकरे गटाला मोठा फटका बसणार असल्याचे मानले जात आहे.

Pune News । पुण्यात गणपती विसर्जनाच्या वेळी हृदयद्रावक घटना; बाप आणि मुलगा दोघेही बुडाले

Spread the love
Exit mobile version