आज (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Naga) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) सभा होत आहे. या सभेला महाविकास आघाडीतीमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर वेगेवेगळ्या मुद्द्यांवरून जोरदार टीका केली आहे.
सर्वात मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू यांचे मोठे वक्तव्य
सध्या बऱ्याच ठिकाणी हिंदू आक्रोश मोर्चा काढला जात आहे. मात्र हिंदूंचा नेता पंतप्रधान झाल्यानंतरही हिंदूंना आक्रोश करावा लागतोय, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. त्याचबरोबर बेशूद्ध होईपर्यंत गर्भवती महिलेची चौकशी करता, हेच तुमचं हिंदुत्व का? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे.
मविआच्या वज्रमुठ सभेतून अजित पवार कडाडले; म्हणाले, “धमक असेल तर…”
उद्धव ठाकरे गटाचे चिन्ह आणि पक्ष हे शिंदे गटाला मागच्या काही दिवसापूर्वी देण्यात आले आहे. याबाबत सर्वोच न्यायालयाने निकाल देखील दिला आहे. आता या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले, चिन्ह, पक्ष आणि माझे वडील चोरले आहेत, एकनाथ शिंदेंना बाप सुद्धा दुसऱ्याचा लागतो असे उद्धव ठाकरे या सभेमध्ये म्हणाले आहेत.
छोटू दादा झाला आचारी अन् पाच रुपयांना विकली बिर्याणी थाळी! पाहा व्हायरल Video
त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून देखील सरकारला धारेवर धरण्यात आले. तुम्ही ५० खोके घेतलेत पण शेतकऱ्यांना काय मिळणार? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाजपमध्ये प्रवेश करणार