
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद गमवावे लागले. मुख्यमंत्री पद गेल्यावरून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली.
धक्कादायक! थंडीमुळे १४ जणांचा मृत्यू
मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी यावेळी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. सरकारच्या कारभारात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हस्तक्षेप केल्यामुळेच उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले, असा आरोप महाजन यांनी केलाय. ते मुंबईमध्ये (Mumbai) मनसेच्या सभेत बोलत होते.
Sujay Vikhe Patil: “…म्हणून सुजय विखे पाटील राजकाणात”
प्रकाश महाजन यांनी संजय राऊत (Sanjay Raut) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देखील निशाणा साधलाय. ते म्हणाले, महाविकास आघाडी तयार करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील नारद शरद पवार, झाकणझुले संजय राऊत यांचा समावेश होता. यांना सत्तेशिवाय करमत नाही”.
Pune: पुणे येथील काही खासगी आयटी क्लासेसकडून विद्यार्थ्यांची फसवणूक