शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) स्थापन झाले आणि शिवसेनेचे (Shivsena) दोन गट पडले. यादरम्यान शिवसेना कोणाची? आणि धनुष्याबाण कोणाचा? हे मोठे प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला. यावर नुकताच निवडणूक आयोगाने महत्व पुर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाला आहे. यामुळे मागील 60 वर्षांपासून शिवसेना व ठाकरे हे नाते आता संपुष्टात आले आहे. आता या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना व धनुष्यबाण मिळताच एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आज सत्याचा…”
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. शिवसैनिकांनी अजिबात खचून जाऊ नये. मी मैदानात उतरलो आहे आणि विजय मिळूनच थांबणार. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यांना शिवसेना प्रमुखांचा फोटो चोरावा लागतो , शिवसेना हे नाव चोरावा लागते त्यांना एवढंच नाही तर शिवसेनेचे धनुष्यबाण चोरावा लागत आहे, असे चोर कधीही मतदारांकडे जाऊ शकत नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
“…म्हणून धनुष्यबाण हे शिवसेनेच चिन्ह”; तीस वर्षांपूर्वीचा ‘हा’ इतिहास तुम्हाला माहिती आहे का?
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, “काय सुरुवात करायची आणि काय बोलायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. मी तर असे म्हणेन की दुर्दैव आपल्या देशातच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर घोषणा करायला हरकत नाही की ७५ वर्षाचे स्वातंत्र्य संपले.”
चिन्ह आणि पक्षाच नाव हातातून निसटताच ठाकरे गटाने घेतला मोठा निर्णय