एकनाथ शिंदेनी बंडखोरी करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यांनतर मूळ शिवसेना (Shivsena) नेमकी कोणाची हा वाद सातत्यानं चर्चेत येत आहे. नंतर हा वाद निवडणूक आयोग आणि सर्वाेच्च नायालयासमोर गेला असून त्यांच्यासाठी देखील हा वाद आता एक मोठं आव्हान ठरत आहे. यामध्येच आता ठाकरे गटाच्या अडचणीत अजून वाढ झाली असून उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे.
आमदार बच्चू कडूंचा अपघात की घातपात? राष्ट्रवादीच्या आमदाराने उपस्थित केला प्रश्न
२३ जानेवारीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांनी २०१८ मध्ये पक्षप्रमुख पदाची शप्पथ घेतली होती. त्यामुळे आता ठाकरे गटाचं पुढं काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ गावात शेतीला बांधच नाहीत; सगळीकडे रंगलीय जोरदार चर्चा
२३ जानेवारीच्या आत आयोगाला मूळ शिवसेना कोणाची निर्णय देण्याचे बंधन आहे. त्यामुळे लवकरच या वादावर निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. याआधी आयोगाने ज्या गटाकडे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या जास्त, त्या गटाला पक्षाचे मूळ नाव व चिन्ह देण्याचे निर्णय अनेक प्रकरणांमध्ये दिले आहेत. याच निर्णयाच्या आधारे शिंदे गटाने आपल्याला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह मिळण्यासाठी दावा केलाय.
बिग ब्रेकिंग! पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मुंबई दौऱ्यावर