ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेनेचे ( बाळासाहेब ठाकरे) मुख्य कार्यालय देखील ठाण्यातील टेंभी नाका येथेच आहे. अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांचा नुकताच ठाणे ( Thane) दौरा पार पडलाय. दरम्यान उद्धव ठाकरे सुद्धा लवकरच ठाणे दौऱ्यावर येणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या राजकीय बंडानंतर प्रथमच उद्धव ठाकरे ठाण्यात येणार आहेत.
राखी सावंतच्या लग्नाबद्दल पहिल्या पतीने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “…तर कधी मुस्लीम बनते”
यामुळे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी देखील सुरू झाली आहे. उद्या (दि.26) प्रजासत्ताक दिनी ठाण्यामधील तलाव पाळी परिसरात एका शिबिराला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
दौंडच्या घटनेबाबत मोठी अपडेट; पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
यानंतर शिवसेनेचे ( Shivsena) दिवंगत नेते आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्धव ठाकरे आनंद आश्रमात जाणार आहेत. ठाकरे यांचा हा दौरा दुपारी 12 वाजता सुरू होणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत ते ठाण्यातच असणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे टेंभी नाका परिसरातील जैन मंदिरात देखील ते विशेष उपस्थिती दाखवणार आहेत.