उद्धव ठाकरे बुलढाणा (Buldhana) जिल्हा दौऱ्यावर आहेत. बुलढाण्यातील चिखली मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभा घेतली. या जिल्ह्यामधील दोन आमदार आणि एक खासदार शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्याकडे ठाकरें विशेष लक्ष आहे. यावेळी या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चाना उधाण
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “आज भाजप भाकड पक्ष झाला आहे, यांच्या पक्षात आयात सुरु आहे. या ठिकाणचे गद्दार आमदार खासदार आहेत या लोकांना नाव शिवसेनेचं पाहिजे, बाळासाहेबांचं पाहिजे आणि आशीर्वाद ,मात्र नरेंद्र मोदींचे पाहिजेत.” अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्यासाठी पाळावी लागणार ‘ही’ अट
पुढे ते म्हणाले, “हा नक्की पक्ष आहे की चोरबाजार? स्वत:च काही शिल्लक राहील नाही म्हणून बाहेरुन सगळे घेऊन समोर उभे केलेत, अशी जहरी टीका देखील ठरेना यावेळी केली आहे. त्याचबरोबर ते म्हणाले, ”मी या ठिकाणी शेतकऱ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. मी त्वेषानं उभा आहे. पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारचं आहे, असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय.