Ujjwal Nikam । आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha election) महायुतीने चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. त्यामुळे अनेक दिग्ग्ज राजकीय नेते महायुतीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहे. अनेक नेते पक्षांतर करत आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतून भाजप नेत्या आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. (Latest marathi news)
त्यांच्या जागी भाजपने कोणतीही राजकीय भूमिका नसलेले प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad vs Ujjwal Nikam) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल.
Ajit Pawar । मोठी बातमी! अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर जहरी टीका; म्हणाले, ‘माझ्या कामाचं श्रेय…’,
भाजपकडून एक पत्रक प्रसिद्ध केलं असून त्यात उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून तिकीट दिल्याचं जाहीर केलं आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मतदारसंघात पहिल्यांदाच प्राध्यापिके विरोधात एका वकिलाची लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. या दोन्ही उमेदवारांचा या मतदारसंघाशी फारसा संबंध नाही, तरीही त्यांना उमेदवारी दिली आहे.
Ajit Pawar । “…. तर मी कोणाच्या बापाच ऐकत नाही,” अजित पवार स्पष्टच बोलले