Maharashtra Politics । निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. काल केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Loksabaha election date) जाहीर केल्या आहेत. देशात सात टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) रणशिंग फुंकले आहे. ते सतत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करत आहे. अशातच अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी शिवतारेंवर जोरदार निशाणा साधला आहे. (Umesh Patil on Vijay Shivtare)
विजय शिवतारेंनी अजित पवारांमुळे आपल्यावर ताण येऊन तब्येत बिघडून किडनीचे आजार झाला असा गंभीर आरोप केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना उमेश पाटील म्हणाले की,” शिवतारे धादांत खोटं बोलत असून त्यांना जे काही त्रास झाले आहेत, ते कौटुंबिक भांडणातून झाले आहेत. अख्ख्या महाराष्ट्राने यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आलेला पाहिला आहे. कौटुंबिक वादातून त्यांच्यावर ताण आला, त्यातून त्यांना हे आजार झाले आहे,” असा दावा उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केला आहे.
Lok Sabha Election । सावधान! दोन वेळा मतदान केले तर… निवडणूक आयोगाने दिला गंभीर इशारा
“10 वर्ष शिवतारे आमदार होते, त्यातील दुसऱ्या टर्मला मंत्रीदेखील होते, सिंचन मंत्री होते. शिवतारेंनी पुरंदर तालुक्यासाठी काय केलं? गुंजवली धरण शिवतारेंनी बांधलं आहे का? त्यात त्यांचं काय योगदान आहे? शिवतारे फक्त सांडव्यासाठी उपोषणाला बसले. सर्व काम झाल्यानंतर 0.1 टक्के कामासाठी त्याच्यासाठी यांनी उपोषणाला बसण्याचं नाटक केलं,” असा गंभीर आरोप देखील उमेश पाटील यांनी केला.
Maharashtra Lok Sabha । ‘या’ तारखेला महाराष्ट्रात पार पडणार मतदान, जाणून घ्या सर्व माहिती