
सोशल मीडियावर (Social media) दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्याही असाच एक व्हिडीओ सोशल मियद्यावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हत्ती भूकेने व्याकुळ झाला आहे. त्यामुळे हत्ती (elephant) तिथे पडलेले प्लास्टिक हत्ती खात असल्याचे दिसत आहे. कदाचित यामुळे पुढे काय दुष्परिणाम होऊ शकतात याची कल्पना या हत्तीला नसेल. पण भूक मिटावी यासाठी तो प्लास्टिक खात असल्याचे दिसत आहे.
संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा; महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता
हा व्हिडीओ भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी सुप्रिया साहू (Officer Supriya Sahu) यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी खंत देखील व्यक्त केली आहे.
गाणी ऐकूण गायींच्या दुधात होते वाढ, तरुणाने केले सिद्ध; वाचा सविस्तर
When humans become slaves of throwaway plastic the price is paid by wild animals. Its a tragedy beyond measure 😢
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) November 18, 2022
Video – shared #stopplasticpollution #ClimateCrisis pic.twitter.com/FSPCbmkIEV
हा व्हिडीओ शेअर करत अधिकारी सुप्रिया साहू यांनी कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘जेव्हा मानव प्लास्टिक फेकून देण्याच्या सवयीचा गुलाम बनतो, त्यावेळी त्याची किंमत वन्य प्राण्यांना मोजावी लागते. ही मोठी शोकांतिका आहे’. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
मानसी नाईकने घटस्फोटावर सोडले मौन; म्हणाली, “माझ्या आयुष्यातील…”