
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. दरम्यान शेती करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना समोर जावं लागतंय. दरम्यान या संकटांमध्ये विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तीमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच दुसऱ्या वेगळ्या कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तर काही शेतकऱ्यांना अपंगत्व येते.
देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावे लागणार नाहीत
दरम्यान अशा अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आलेली आहे. सर्व शेतकऱ्यांची विमा हप्त्याची रक्कम शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. याअंतर्गत शेतकर्यांना खालीलप्रमाणे नुकसान भरपाई मिळते. यामध्ये अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रु.2 लाख रुपये मिळणार. तर अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये मदत मिळणार.
“पोलिस कर्मचाऱ्यांना एक पगार एवढा बोनस द्या..”, अमित ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलं भावनिक पत्र
- लाभ घेण्याकरीता आवश्यक कागदपत्रे
1) 7/12 उतारा किंवा 8अ.(मुळ प्रत)
2) मृत्यूचा दाखला
3) प्रथम माहिती अहवाल. मग यामध्ये विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल
4) घटनास्थळ पंचनामा
5) शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र/ ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा पारपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र.
6) वयाचा दाखला (नसल्यास शपथपत्र)
7) खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका
आनंदाची बातमी! भीमा पाटस कारखाना होणार लवकरच चालू
- प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे
1) ज्या नोंदी वरुन अपघातग्रस्त शेतक-याचे नाव 7/12 वर आले असेल अशी संबंधीत फेरफार नोंद मुळ उतारा अथवा फेर फार नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिका-याने दिलेले प्रमाणपत्र.
2) शेतक-याचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं.6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.
3) विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र.
अर्ज कोठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालयात.
विमा कंपनी: युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
टोल फ्री नंबर- 1800224030
विमा सल्लागार कंपनी (ब्रोकर) :- मे.ऑक्झिलियम इन्शुरंन्स ब्रोकींग प्रा.लि.
प्लॉट ने.61/4, सेक्टर-28, प्लाझा हट च्या पाठीमागे,वाशी, नवी मुंबई-400703
दुरध्वनी क्रमांक-022-27650096, टोल फ्री क्रमांक – 1800220812
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या ५६ व्या वर्षी केले २३ वर्षीय मुलीशी गुपचूप दुसरं लग्न, कारण…