शेतकऱ्यांना (Farmer) शेतीसाठी विरजपुरवठा रात्रीच्या वेळी देखील केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच देखील जावं लागत. रात्रीच्या वेळी शेतीमध्ये गेल्यावर अंधारामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. सध्या देखील एक धक्कदायक घटना समोर आली आहे.
“अर्थसंकल्प म्हणजे ‘बड्या-बड्या बाता अन्…”, शेतकरी नेते रविकांत तुपकर संतापले
रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरूण शेतकऱ्याचा तुटलेल्या विद्युत तारेत अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मावसगव्हान (ता.पैठण) येथील लोहगाव शिवारात ही धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
फडणवीसांच्या पहिल्याच बजेटवर अजित पवार संतापले; म्हणाले…
माहितीनुसार, हा तरुण आपल्या पिकाला रात्रीच्या वेळी पाणी देण्यास चालला होता. त्यावेळी विजेच्या खांबावरून एक तार तुटून खाली पडली होती. ही तार रात्रीच्या अंधारात त्या शेतकऱ्याला दिसली नाही. त्यामुळे तो अडकला आणि विजेचा धक्का लागून या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे.