अहमदनगर: आपण पाहतोय की अनेक भागात परतीचा पाऊस जोरदार कोसळत आहे. या पावसामुळे (rain) शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान तर झालेच आहे. अशातच परतीच्या पावसामुळे विद्युत तारा तुटण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यात येठेवाडी गावात तुटलेल्या विद्युत तारेच्या करंट तळ्यात उतरल्यानं एक भीषण दुर्घटना घडली आहे. विद्युत तारेला चिकटून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माणुसकी दाखवणे पडले महागात, अज्ञात व्यक्तीला दिली लिफ्ट आण तो निघाला चोर
या घटनेत दर्शन अजित बर्डे (वय 6), विराज अजित बर्डे (वय 5) अनिकेत अरुण बर्डे (वय 6) ओंकार अरुण बर्डे (वय 7) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
मोठी बातमी! दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या प्रथमेशचे निधन! केईएम रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
घटना अशी घडली की, येठेवाडी गावात अंघोळीसाठी गेलेल्या तळ्यात तुटलेल्या विद्युत तारेच्या झटक्याने ही चारही मुलं दगावली. घराजवळ असलेल्या तळ्यावर चौघे अंघोळीसाठी गेले होते .ही चारही मुले एकाच कुटुंबातील आहेत. खरतर वादळी वाऱ्याने तुटलेल्या केबलमध्ये प्रवाह सुरू असल्यानेच ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांची झाली चांदी! दिवाळीआधीच महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला