
दौंड : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सध्या बारामती लोकसभेच्या प्रवास दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी रमाई महिला बचतगट पेडगाव ता.दौंड जि.पुणे यांना श्री वासुदेव नाना काळे (प्रदेशाध्यक्ष भाजप किसान मोर्चा) यांच्या प्रयत्नातून केंद्रीय कृषी मंत्रालय दिल्ली यांच्याकडून ट्रॅक्टर मिळाला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्रॅक्टरचे पूजन केले आणि बचत गटातील सदस्यांशी सवांद देखील साधला.
त्याचबरोबर श्री वासुदेव नाना काळे (प्रदेशाध्यक्ष भाजप किसान मोर्चा) यांच्या प्रयत्नातून केंद्रीय कृषी मंत्रालय दिल्ली यांच्याकडून मालवाहतूक (Ac) पिकअप श्री वासुदेव नाना काळे बचत गट अध्यक्ष श्री. गोपाळ खुडे, सचिव श्री.रामदास डाळिंबे शिरापूर ता.दौंड जि. पुणे यांना मिळाली आहे. दोन्हीही बचत गटांना केंद्रीय कृषी मंत्रालय दिल्ली यांच्याकडून १००% अनुदानावर वाहने मिळाली आहेत.
यावेळी बारामती लोकसभा प्रभारी आमदार श्री.राम शिंदे, मा.मंत्री हर्षवर्धन पाटील, वासुदेव नाना काळे (प्रदेशाध्यक्ष भाजप किसान मोर्चा), आमदार.श्री. राहुल कुल, गणेश भेगडे (भाजपा. पुणे.जि.अध्यक्ष ), गणेश जगताप, सौ. कविता घोडके (रमाई बचत गट अध्यक्ष), वैशाली कांबळे (रमाई बचत गट उपाअध्यक्ष) इत्यादी उपस्थित होते.