
दौंड : तालुक्यातील रेल्वे संबंधित विविध प्रश्नांसंदर्भात पाठपुराव्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना.श्री. रावसाहेब दानवे पाटील साहेब यांची आमदार राहुल कुल यांनी २ नोव्हेंबर रोजी भेट घेतली. या भेटीमध्ये मध्य रेल्वे विभाग, दौंड शहर व तालुक्यातील रेल्वे संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीसाठी स्वतःदानवे साहेबांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात दौंड तालुक्यात बैठक व स्थळपाहणी होणार आहे.
शरद पवारांवर रुग्णालयात नक्की कोणते उपचार सुरू आहेत? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं
बैठकीमध्ये ‘या’ मागण्या व विविध समस्या उपस्थित केल्या –
- दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु करावी.
- माननीय मंत्री महोदयांच्या आदेशाने दौंड तालुक्यातील सहजपूर, खामगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलद सुरु करण्यात यावे.
- पुणे-सोलापूर मार्गावरील दौंड जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या तिसऱ्या कुरकुंभ मोरीचे उर्वरित तांत्रिक काम तात्काळ पूर्ण करून ती नागरिकांसाठी खुली करण्यात यावी.
राजू शेट्टी शरद पवारांवर भडकले! शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा केला आरोप
- खुटबाव येथील रेल्वे फाटकावर रेल्वे उड्डाण पूल उभारण्यात यावा तसेच कडेठाण व कानगाव येथे सुरु असलेल्या RUB चा कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठत असून त्याठिकाणी पाण्याच्या निचरा होण्यास होत असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता कडेठाण व कानगाव येथे रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात यावेत.
- दौंड शहरातील रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या सुमारे ६७० झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे व पुनर्वसन होईपर्यंत रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांची घरे खाली करण्यात येऊ नयेत.
विठ्ठला…बळीराजाला सुख समृद्धी दे…!, आ.बबनराव पाचपुते यांचे विठ्ठल चरणी साकडे
- दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमु लोकलचे दर पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावेत व पुणे – हैद्राबाद – पुणे (AC सुपर फास्ट), मुंबई – चेन्नई – मुंबई सुपरफास्ट, LTT – विशाखापट्टणम सुपर फास्ट आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा दयावा.
- वाढती लोकसंख्या व नागरीकिकरण लक्षात घेता पुणे-दौंड रेल्वे ट्रॅक चे चौपदरीकरण करावे व यवत आणि उरुळी च्या मध्ये सहजपुर ,उरुळी आणि लोणी च्या मध्ये नायगाव, मांजरी आणि हडपसर च्या मध्ये अमनोरा आदी नवीन स्थानकांची निर्मिती करावी.
भर रस्त्यावर बायकोने नवऱ्याला दिला चोप; पाहा VIDEO
सर्व मागण्यांच्या बाबत रेल्वे राज्यमंत्री मा. रावसाहेबजी दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.