केंद्रीय अर्थमंत्री निर्मिला सीतारामन या बारामती लोकसभेच्या दुसऱ्या दौऱ्यासाठी येणार आहेत. यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल बारामती लोकसभा मतदार संघामध्ये दाखल झाले आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज पुणे विमानतळावर त्यांचे स्वागत केले आहे.
चक्क बकरीच्या पिल्लाचा केला वाढदिवस साजरा ! इतकेच नाही तर, डीजे लावून फोटोसुद्धा काढले…
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल बारामती मतदार संघामध्ये आज आणि उद्या असणार आहेत. यावेळी ते आज ११ नोव्हेंबर रोजी खडकवासला, भोर, पुरंदर, जेजुरी, बारामती या ठिकाणी भेटी देणार आहेत तर उद्या १२ नोव्हेंबर रोजी बारामती, इंदापूर, दौंड या ठिकाणी भेटी देणार आहेत.
सावधान! लॉटरीचे आमिष दाखवून होतेय फसवणूक; महिलेचे 50 हजारांचे नुकसान
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल बारामती आणि इंदापूर तालुक्यामधील शेतकरी संघटना, समित्यांच्या प्रमुखांना भेटणार आहेत. तसेच सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते श्री.चंद्रराव तावरे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, माळेगाव कारखाना माजी अध्यक्ष श्री.रंजन तावरे आणि श्री.सतीश काकडे यांची भेट घेऊन चर्चाही करणार आहेत.
IND vs ENG: रोहित शर्मा ढसाढसा रडत होता ‘या’ व्यक्तीने काढली समजूत, यालाच तर म्हणतात टीम इंडिया
उद्या १२ नोव्हेंबरला केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल भिगवण येथे मेळाव्याला देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्यासोबत आमदार राम शिंदे, गणेश भेगडे, वासुदेव नाना काळे इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
दिव्यांगांसाठी होणार स्वतंत्र मंत्रालय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय