
पुणे : पुण्यामधील युनिक एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेने कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्र सीएसआर अवॉर्ड 2022 हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या संस्थेने मागच्या वर्षी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोजेक्ट अंतर्गत ग्रामीण आणि निमशहरी भागातील 500 पेक्षा जास्त महिलांना कॉम्प्युटर, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, नर्सिंग, वायर हार्नेस असेम्ब्ली ऑपरेटर, pcb असेंब्ली ऑपरेटर क्षेत्रामधील वेगेवगळ्या कोर्सचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. गरजूंना विविध कोर्सचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम युनिक एज्युकेशन सोसायटी करत आहे.
या संस्थेचे संचालक विजय कुलकर्णी आणि बाळासाहेब झरेकर यांनी महाराष्ट्र सीएसआर अवॉर्ड 2022 हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार वितरणाच्या वेळी अनेक नामांकित कॉर्पोरेट्स, एनजीओ, सरकारी अधिकारी, राजकीय नेते आणि शिक्षणतज्ञ इत्यादी उपस्थित होते.