Unmesh Patil । लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha) तोंडावर ठाकरे गटाने भारतीय जनता पक्षाला (BJP) खूप मोठा धक्का दिला आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अशातच आज जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. पण प्रवेशापूर्वी एका बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Latest marathi news)
आज उन्मेश पाटील यांच्यासह करण पवार (Karan Pawar) हे देखील ठाकरे गटात प्रवेश करणार असून निवडणुकीची उमेदवारी करण पवार यांना दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक करण पवार हेच जिंकतील, अशा आशयाचे पोस्टर जळगावमध्ये व्हायरल झाले आहेत. दरम्यान, कालपासून करण पवार यांच्या नावाचे बॅनर व्हायरल झाले आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Fire । छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू
या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह उन्मेश पाटील यांचा फोटो आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर करण पवार यांच्यासह उन्मेश पाटील यांचं देखील ठाकरे गटाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे उन्मेश पाटील यांच्यासोबत त्यांचे समर्थक नेते आणि कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
Ahmednagar Politics । …. तर मी उमेदवारी मागे घेणार, निलेश लंकेंना सुजय विखेंनी दिलं खुलं आव्हान