मुंबई : मागच्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरणात चांगलीच उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट हे दोन्ही गट दसरा मेळाव्यात आपआपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे आज शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्या मध्ये उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंच्या भाषणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
Lumpy: देशात ‘लम्पीचा’ धुमाकूळ! जनावरांच्या मृत्यूचा आकडा वाढला, पशुपालकांनो अशी घ्या काळजी..
नेस्को सभागृहामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात झाली.बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, व्यासपीठावर आल्यानंतर आधी पाहिले आमचे वडील आहेत, का जागेवर ते पाहिलं. कारण आतापर्यंत मुलं पळवणारे पाहिले होते. आता बाप पळवणारेही आल्याची जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर केली आहे.
दरम्यान, शिवाजी महाराज यांच्या काळात आदिलशाह, निजामशाह होते. त्यांच्याच कुळातले शाह आत्ता काही दिवसांपूर्वी येऊन गेले. अमित शाह देशाचे गृहमंत्री ते काय म्हणाले की शिवसेनेले जमीन दाखवायची. आपल्याला जमीन दाखवायची आहे असं म्हणणाऱ्यांना आपण आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही असं नॉल्ट उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलयं.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना! ‘या’ महिन्यापर्यंत मिळणार मोफत धान्य