जोपर्यंत काट्यांबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही; राजू शेट्टी आक्रमक

Until the forks are decided, the agitation will not stop; Raju Shetty Aggressive

मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाली आहे. कारखानदार शेतकऱ्यांच्या मालात काटा मारून त्यांची फसवणूक करतात. यावर सरकारने निर्णय घ्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. इतकेच नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju shetti)या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलनाच्या तयारीत देखील आहेत. दरम्यान येत्या 29 नोव्हेंबर ला राजू शेट्टी यांना सहकार मंत्र्यांनी बैठकीस बोलावले आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यात आंदोलन होईल. असा इशारा त्यांनी दिलाय.

मनसेकडून गृहमंत्रालयाला इशारा; गौतमी पाटील वर कारवाई करा अन्यथा…

या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, “शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचे सगळे नियम रद्द केले मग एकरकमी एफआरपी कायद्यात दुरुस्ती करण्याची संधी होती ती का केली नाही ?” याशिवाय सरकारने वाघ आहे की शेळ्या हे दाखवू नये. जोपर्यंत काट्यांबाबत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे.

दिलासादायक! ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला ३५०० रुपये दर

या’ मागण्यांसाठी आंदोलन होणार

1) एफआरपी ( FRP) दोन टप्प्यात विभागून देण्याचा सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना मान्य नसल्याने तो रद्द करण्यात यावा.
2) कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काटा मारला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होतीये. हे टाळण्यासाठी वजनकाटे ऑनलाइन ( Online weight in sugar factory) करायला हवेत.
3) सर्व ऊस तोडणी कामगार तोडणी महामंडळामार्फतच साखर कारखान्यांना पुरवावेत.

संजय राऊतांच्या अडचणीत पुन्हा वाढ, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *