Uorfi Javed: उर्फी जावेदचा नवीन व्हिडिओ व्हायरल; अतरंगी लुकमुळे रेस्टॉरंटमध्ये नो एन्ट्री!

Uorfi Javed: Urfi Javed's New Video Viral; No entry in the restaurant due to Atrangi look!

आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद ( Urfi Jawed) कायम चर्चेत असते. मध्यंतरी उर्फी जावेदच्या एका पोस्टची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू होती. यामध्ये तिने एक धक्कादायक दावा केला होता. मुंबईमधील एका रेस्टॉरंट मध्ये उर्फीला तिच्या कपड्यांमुळे प्रवेश दिला नाही, असा आरोप तिने यामध्ये केला होता. तुम्हाला मी आवडत नसेल तर तुम्ही माझ्याकडे खुशाल दुर्लक्ष करा. परंतु, तुम्ही मला अजिबात इग्नोर करू शकत नाही. २१ व्या शतकात मला माझ्या कपड्यांमुळे रेस्टॉरंट मध्ये येण्यास बंदी आहे. असे ती म्हणाली होती. ( Urfi Jawed at restorent)

गौतमी पाटील कोणासमोरही नाचेल तुला काय त्रास आहे? अजित पवारांचा मिश्किल टोमणा!

दरम्यान उर्फी जावेदचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये ती एकदम अतरंगी लुक मध्ये आहे. या लुक मध्येच ती एका रेस्टॉरंट मध्ये जाते. मात्र या रेस्टॉरंटमध्ये तिला येऊ दिले जात नाही. यावेळी अतिशय संतापून उर्फी जावेद रेस्टॉरंटच्या मॅनेजर सोबत भांडण करत आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोक उर्फी जावेदचे समर्थन करत आहेत तर काही लोकांनी उर्फीला टोकले आहे. ( Viral Video)

रत्नागिरी रिफायनरी बाबत घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय! उदय सामंत यांनी घेतली महत्त्वाची बैठक

माझ्या अशा लुक मुळेच मला रेस्टॉरंटमध्ये येऊ दिले जात नाहीय. असं उर्फी जावेद म्हणत आहे. खरंतर उर्फी जावेद तिच्या विचित्र लुक मुळे सतत ट्रोल होत असते. काही दिवसांपूर्वी तिने याच कारणामुळे आपल्याला मुंबईमध्ये घर मिळत नसल्याची तक्रार केली होती. ईदच्या ( Eid) दिवशीसुद्धा उर्फीने सोशल मीडियावर आपले बिकनीमधील फोटो पोस्ट केले होते. यावरून सुद्धा अनेकांनी उर्फीला खडे बोल सुनावले होते.

calls : कॉल्स आणि SMS मध्ये होणार हे बदल, १ मे पासून येणार नवीन नियम…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *