भारतातील कित्येक तरुण अधिकारी (Government Officer) व्हायचं स्वप्न डोळ्यात ठेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. यूपीएससीची म्हणजेच लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. आज UPSC 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये ठाण्यातील डॉ.काश्मिरा संखे (Dr. Kashmira Sankhe) यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पेशाने डेंटिस्ट असणाऱ्या डॉ. काश्मिरा यांनी स्वतःचा पेशा सांभाळत अभ्यास करून हे यश मिळवले आहे.
धक्कादायक! पत्नीला ९ वेगवेगळ्या पुरुषांसोबत संबंध ठेवायला लावले आणि नंतर…
डॉ. काश्मिरा यांनी आपल्या या यशाचे श्रेय आपल्या आईवडिलांना दिले आहे. IAS ऑफिसर बनून देशाची सेवा करणार असल्याचे आपले स्वप्न होते व ते पूर्ण झाले आहे. अशा भावना डॉ. काश्मिरा शेख यांनी आज व्यक्त केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे यंदाच्या UPSC 2022 च्या निकालात अव्वल चार पदांवर मुलीचं आहेत.
यामध्ये पहिल्या क्रमांकावर इशिता किशोर, दुसऱ्या क्रमांकावर गरीमा लोहिया, तिसऱ्या क्रमांकावर उमा हर्थी आणि चौथ्या क्रमांकावर स्मृती मिश्रा आहे. नागरी सेवकांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या देशातील सर्वात कठीण परीक्षेत मुलींनी मिळवलेले हे यश अभिमानास्पद आहे. दरम्यान देशातील सर्वच स्तरांवरील लोकांकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.