
मुंबई : अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता उर्फी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. लाइव्ह सेशनमध्ये एका युजरने उर्फीला सेक्ससंबंधी प्रश्न विचारल्यानंतर उर्फी जावेद त्या युजरवर चांगलीच भडकली.
Eknath Shinde: पोलीस, अग्नीवर भरतीसाठी तरुणांना आवश्यक सुविधा पुरवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर नुकतंच एक ‘आस्क मी एनिथिंग’ असं टाकलं होत . यावेळी तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. पण एका युजरनं तिला आक्षेपार्ह प्रश्न विचारला ज्यावर उर्फी जावेद चांगलीच भडकली. याशिवाय या सेशनमध्ये तिने तिची ग्लोइंग स्किन, फॅशन यांसारख्या गोष्टींवरही देखील भाष्य केलं.
एका युजरनेही, ‘तू माझ्याशी सेक्स करशील का?’ असा प्रश्न विचारला. यावर उर्फी चिडून म्हणाली, “सेक्स को आम का अचार समझ बैठे हो क्या?” सध्या तिचे वक्तव्य सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.